चित्रपटाचे 6 पोस्टर दीपिकाच्या वाढदिवशी झळकले
दीपिका पदूकोनने बुधवारी स्वतःचा 36 वा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त अभिनेत्रीने स्वतःच्या चाहत्यांना विशेष भेट दिली आहे. दीपिका आणि सिद्धांत यांच्या ‘गहराइयां’ चित्रपटाचे 6 पोस्टर्स शेअर करण्यात आले आहेत.
या चित्रपटात दीपिका अन् सिद्धांत चतुर्वेदीसह अनन्या पांडे आणि धैर्य करवा देखील आहेत. हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर 11 फेब्रुवारी स्ट्रीम केला जाणार आहे. पूर्वी हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता.
शकुन बत्रा यांचे दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट सद्यकाळातील प्रेमसंबंध, तरुणाईचे जीवन आणि त्यांच्या नात्यांमधील गुंतागुंत दर्शविणारा आहे. जौस्का फिल्म्सच्या सहकार्याने धर्मा प्रॉडक्शन्स आणि वायकॉम 18 स्टुडिओजकडून याची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा आनंद देशविदेशामधील प्रेक्षक अमेझॉन प्राइम व्हिडिओवर घेऊ शकणार आहेत.