कोलकाता
कोरोनाविरुद्ध लढय़ात बीसीसीआय अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुलीचा पुढाकार राहिला असून शनिवारी त्याने कोलकातामधील इस्कॉन मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या तब्बल 10 हजारहून अधिक लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. गांगुलीने या मदतकार्याचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
विशेष म्हणजे, जगप्रसिद्ध अशा इस्कॉन मंदिर व्यवस्थापनाकडून कोलकाता शहरात दहा हजारहून अधिक लोकांच्या भोजनाची सोय केली जात आहे. या दरम्यान गांगुलीने इस्कॉन व्यवस्थापनाला मदत करत आपला हातभार लावला आहे.
दरम्यान, मागील आठवडय़ात गांगुलीने 50 लाख रुपयांचे तांदूळ गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी राज्य सरकारला दिले होते. कोलकात्यामधील बेलुर मठात बंगालमधील अनेक गरजू लोक वास्तव्यास असल्याचे समजल्यानंतर त्याने दोन हजार किलो तांदूळ याठिकाणी दान केले आहेत.