वृत्तसंस्था / कोलकाता
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तसेच माजी कर्णधार सौरभ गांगुली यांना अलिकडेच हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लॅस्टी करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी त्यांच्या आणखी काही वैद्यकीय चांचण्या घेण्यात आल्या.
मंगळवारी गांगुली यांची रक्त तपासणी करण्यात आली. रक्ततपासणीचा अहवाल समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले असून तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर इलाज करीत आहेत. 2 जानेवारी रोजी सौरभ गांगुलीला येथील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना 6 जानेवारीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.