ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या गांडरबलमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करून ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला असून, शोधमोहीम सुरू आहे.