प्रतिनिधी / उचगांव
गांधीनगर पोलीस ठाण्याच्याहद्दीत चोरट्यांनी धुमाकुळ घातला असुन शनिवारी पहाटे चोरट्यांनी गांधीनगर चिंचवाड मुख्य रस्त्यावरील सहा दुकानांना लक्ष करुन सुमारे पंचवीस हजारासह चांदीचे दागिने लंपास केले. करवीर तालुक्यातील गांधीनगर ते चिंचवाड मुख्य रस्त्यावरील वळीवडे गावच्या हद्दीतील दोन किराणा माल दुकान, एक मोबाईल दुकान, दोन हार्डवेअर दुकाने आणि एका ऑईलच्या दुकानात चोरी झाली.
आज पहाटे तीन ते चारच्या दरम्यान अज्ञात तीन चोरट्यांनी अशोक शेंडगे यांच्या साईसमर्थ दुकानाचे शटर उचकटुन आत प्रवेश केला. ड्रॅावरमधील रोख पाच हजार रुपये घेवुन शेजारी आसणार्या इंद्रा मोबाईल दुकानाचे शटर उचकटुन तिथल्या ड्रॅावरमधुन दहा हजार रुपये व चांदिचे दागिने लंपास केले. तेथुन काही अंतरावर असणार्या संजय चव्हाण यांच्या हरिप्रिया सेल्स या बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाचा दरवाजा उचकटुन दुकानातील ७ हजार रुपये लंपास केले.
तर उमेश बजाजी यांच्या जीएसके हार्डवेअर मधुन तीन हजार रुपये तर अशोक चव्हाण यांच्या दत्त किराणा स्टोअर्स मधुन माणिकचंद, कोल्हापुरी गुटखा लंपास केला. महालक्ष्मी लुब्रीकेंटसमध्ये चोरट्यांच्या हाताला काहीही लागले नाही. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असुन गांधीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. काही दिवसांपुर्वी सरनोबतवाडीत चोरट्यांनी चार ते पाच बंगल्यांना टार्गेट करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. तो तपास चालु असतानाच पुन्हा चोरीची घटना घडल्याने गांधीनगर परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.