प्रतिनिधी/ बेळगाव
गांधीनगर ओव्हरब्रिजजवळ हरणांची सहा शिंगे जप्त करण्यात आली आहेत. गुरुवारी सीआयडी वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
सीआयडी अरण्य विभागाला या संबंधी माहिती मिळाली होती. सिध्दापूर (ता. अळणावर, जि. धारवाड) येथील मौलाली बुड्डेसाब हंगरकी हा एका पोत्यात हरणांची शिंगे घेऊन त्याची विक्री करण्यासाठी महाराष्ट्राला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, रामाप्पा यरनाळ, के. डी. हिरेमठ आदींचा समावेश असलेल्या पथकाने छापा टाकताच हरणांची शिंगे असणारे पोते तेथेच टाकून मौलालीने तेथून पलायन केले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाची पुढील चौकशी वनविभागाचे अधिकारी करणार आहेत.