उचगाव / वार्ताहर
गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या व मारामारीच्या घटनेत वाढ झाली असुन अवैध धंदेही जोमात असुन पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मोबाईल चोरीच्या संशय घेत गांधीनगरात किसन उर्फ बोबड्या कुंभार याला कमलेश कुमार,महेश जेवराणी,सिकंदर कुमार व अन्य पाच जणांनी काठ्या,विटाने डोक्यात मारुन लाथाबुक्यांनी मारहाण गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली.मारहाण करुन घटनास्थळी डांबून ठेवण्यात आल्याची फिर्याद किसन कुंभार याच्या पत्नीने दिली आहे.
गांधीनगर चिंचवाड रस्त्यावर भाग्यश्री ट्रान्सपोर्ट येथे ६१ हजार रुपयांची चोरी झाली.इलेक्ट्रिक साहित्य,रेडिमेड कपडे असलेले डाग अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.याबाबत निलेश गुरव यांनी फिर्याद दिली आहे.तनवानी कॉर्नरजवळ पुणे बेंगालोर महामार्गाच्यानजीक पार्किंग केलेला आयशर टेम्पो किंमत आठ लाख रुपये अज्ञाताने गायब केल्याची फिर्याद मणेरमळा येथील धोंडाप्पा घोडके यांनी दिली आहे.
शांतीनगर येथून मदन चव्हाण यांची मोटारसायकल चोरीस गेली आहे.गडमुडशिंगी येथेही एकापाठोपाठ चोऱ्या व मारामारीच्या विशेषतः व्हिडीओ पार्लरमध्ये मारामारी ही चिंतेची बाब असताना दुसरीकडे गावठी दारु,चोरुन मटका, सावकारी आदी अवैध धंदेही जोरात सुरु असल्याचे चित्र आहे.पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालून त्वरीत चोऱ्या,मारामारीसह अवैध धंद्यांना चाप बसवावा अशी मागणी जनतेतून होत आहे.