कोरोना नियम भंग प्रकरणी ३४ जणांवर गुन्हा नोंद
उचगाव / वार्ताहर
गांधीनगर ता. करवीर मुख्य रस्त्यावर निगडे वाडीजवळ ओंकार बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या डायट डिलाईट कॅफे अँड रेस्टो नावाच्या हॉटेलमध्ये बुधवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी छापा टाकून ३४ जणांच्यावर कारवाई करून पाच मोटर सायकली जप्त केल्या. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ब , साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1987 चे कलम 2, 3 महाराष्ट्र कोविड 19 चे उपायोजना कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गांधीनगर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
विशाल अशोक पहुजा वय२७ बँरक नंबर ३६, धिरज लखमीचंद केसवाणी (वय २५ रा. साईबाबा मंदिर जवळ गांधिनगर), पंकज संजय वासवानी (वय २३ रा. पाच बंगला परिसर कोल्हापूर), विनीत कुंदन कारडा वय २५, गिरीश मुकेश संतवाणी वय २१ रा.कुटिया मंदिरजवळ, अक्षय दीपक बलेचा वय २० रा.म्हसोबा रोड, विपुल शाम रंगलाणी वय २१, मनीष धरमदास अहुजा वय २७ रा.टेलिफोनअॉफिस , सागर दौलत केसवानी २४ ,राहूल राम सेवलाणी वय २४ रा.राधास्वामी स्टाँप,आशिष सुरेश कटियार वय २३, सुरज राजकुमार रावलानी वय ३२ रा.कुकरेजा कॉलनी, रितेश विजय वच्छाणी वय२१ रा. कुटिया मंदिराजवळ, मोहित अशोक रावलाणी वय २१, मयूर लालचंद आहूजा वय २३रा. जुन्या पोस्ट ऑफिस जवळ, राज लालचंद अहुजा वय २५, आशिष अनिल चावला वय २४रा. बस स्टॉप जवळ , रोशन गँनचंद जेवरानी ३० रा. शांतिनिकेतन आपारमेंट ,सुरज शंकरलाल माखिजा वय २८ रा. राधे-राधे कॉलनी, शारदा संतोष रावलाणी वय ४५ रा. कुकरेजा कॉलनी ,अनुजा रमेश रावलाणी वय २०रा. कुकरेजा कॉलनी, पूजा लालचंद अहुजा वय २८रा. जुने पोस्ट ऑफिस जवळ, रीया अनिलकुमार चावला वय २२ राहणार शिखर चौक,(सर्व रा.गांधीनगर ता.करवीर)
तसेच विष्णू विठ्ठल चव्हाण वय २१ रा. बाजार भोगाव शाहूवाडी, वैभव राजेंद्र सुरवसे वय २२ रा. कसबे तालुका उमरगाव, चंद्रकांत किशोर जाधव वय २१ रा.परळी तालुका शाहूवाडी, अंकुश विष्णू गावडे वय ३४ रा. उमगाव तालुका चंदगड, प्रशांत शिवराम हरणे वय २८ रा. मुम्मेवाडी तालुका आजरा, संजय भागोजी कस्तुरे वय २६ रा. मासवडे धनगरवाडा ता.शाहूवाडी, शुभम ज्योतीराम पाटील वय २१ पाटील गल्ली कदमवाडी, विनायक महादेव अडपत वय २३ रा.सेटलमेंट एरिया हुबळी, मालन कल्लापा चांदणे वय २५ रा. शाहू कॉलेज समोर विचारे माळ कोल्हापूर ,धनश्री सूर्यकांत कांबळे वय २८ रा. शाहू कॉलेज समोर विचारे माळ कोल्हापूर यांच्यावर गुन्हा नोंद झाला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर जमाव बंदी, संचारबंदी आदेश जाहीर केलेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व्यवहार व हॉटेल बंद ठेवण्याचा बंदी आदेश जाहीर केला असताना देखील बुधवारी रात्री उशिरापर्यंत गांधीनगर मुख्य रस्त्यावर खुटाळे कॉम्प्लेक्स शेजारी ओमकार बिल्डिंग वर दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या डायट डिलाईट कॅफे अँड रेस्टो हॉटेल चालू ठेवून गिर्हाईकांना एकत्र जमून कामगारांच्या करवी जेवण देत असताना त्यांच्या तोंडाला मास्क न लावता तसेच सामाजिक अंतर न ठेवता कोरोना विषाणूंचा संसर्ग न होणे करता बंदी आदेशाचे उल्लंघन करून जेवणपार्टी आयोजित केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले ,विजय कारंडे, वैभव पाटील कृष्णात पिंगळे, संजय पडवळ, अर्जुन बंद्रे, संतोष पाटील ,महेश गवळी, रणजीत पाटील, वैशाली पाटील ,सारिका मोठे, नीलम कांबळे , कोमल पाटील, प्रियांका कांबळे, अनिल जाधव, धनश्री पाटील यांनी सहभाग घेतला. गांधीनगर पोलिसात पोलीस नाईक चेतन दिलीप भोंगाळे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस नाईक आकाश पाटील करीत आहेत.
डायट डिलाईट हॉटेल मध्ये कोरोना काळात जमावबंदी व संचारबंदी असतानाही दररोज मोठी लग्न व जेवणाच्या पार्ट्या चालत होत्या अशी चर्चा होती.गांधीनगर पोलिस अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत होते.मात्र बुधवारी एलसीबीने कारवाई केल्यानंतर पोलिस निरीक्षक तानाजी सावंत व पथकाचे परिसरातून कौतुक होत आहे.