उचगांव /वार्ताहर
गांधीनगर (ता. करवीर) येथे सुनिल पंजाबी यांच्या घरामध्ये चालू असलेल्या क्रिकेट बेटिंगवर करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकून सात जणांवर गुन्हा नोंद केला. त्यांच्याकडून एकूण ३९ हजार ७८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गांधीनगर पोलीसात गुन्हा नोंद झाला असून चौघांना अटक केले आहे.
अटक केलेल्यांची नावे अशी :-
मुकेश सुरेशलाल राजानी (वय ३२) , रोशन मुलंचंद निरंकारी (वय २८) , शंकर दमनलाल वाधवानी (वय ५३ ), मनीष लकीराम वढडा ( वय २४, सर्व रा. गांधीनगर ).
दरम्यान, गुन्हा नोंद झालेले अन्य संशयित आरोपी असे: सुनील गोविंदराम पंजाबी ( रा. गांधीनगर ), सूर्यवंशी (पूर्ण नाव समजू शकले नाही), सुरेशलाल गिडवाणी ( दोघे रा. कोल्हापूर ).
सूर्यवंशी व सुरेशलाल गिडवानी यांच्यासाठी सुनील गोविंदराम पंजाबी याच्या गांधीनगर येथील टेलिफोन ऑफिस जवळील घरामध्ये क्रिकेट बेटिंग जुगार देत व घेत असताना करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने छापा टाकून रोख रक्कम २७२० रुपये, २७ हजाराचे पाच मोबाईल हँडसेट व इतर क्रिकेट बेटिंग साहित्य असा एकूण ३९ हजार ७८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक सुनील संभाजी माळी यांनी दिली.
अधिक तपास गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम करीत आहेत.