प्रतिनिधी/ बेळगाव
गांधीनगर येथील एका गॅरेजमध्ये उभ्या करण्यात आलेल्या ट्रकचे टायर चोरण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली असून या संबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
गांधीनगर जवळील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महार्गावरील सर्व्हिस रोडवर असलेल्या लक्ष्मी मोटर्स बॉडीबिल्डींग या गॅरेजमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून वापी-मुंबई येथून एक ट्रक कामासाठी सोडण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे गॅरेज बंद होते. गॅरेजच्या आवारतच ट्रक उभी करण्यात आली होती.
एम. एच. 03 सीव्ही 1908 क्रमांकाच्या बाराचाकी ट्रकचे पाठिमागील 8 टायर चोरटय़ांनी चोरल्याचे उघडकीस आले आहे. गॅरेजचे संचालक सिद्राई बंटरगाळी यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.