दिल्ली दंगलप्रकरणी उच्च न्यायालयाचा दणका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली दंगलीतील एका प्रकरणात उच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्ये÷ नेते अनुराग ठाकूर, अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. गांधी कुटुंबियांबरोबरच भाजपचे फायरब्रँड नेते कपिल मिश्रा, भाजप खासदार परवेश वर्मा, आप आमदार अमानतुल्ला खान यांच्यासह सुमारे 25 जणांना नोटीस पाठवली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात दिल्ली दंगलीच्या प्रकरणांमध्ये पक्षकार म्हणून या सर्व नेत्यांवर खटला का चालवला जाऊ नये? अशी विचारणा या नोटिसीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदिरट्टा यांच्या खंडपीठाने ही नोटीस जारी केली आहे. वारिस पठाण, मेहमूद पारचा आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांचाही त्यात समावेश आहे. या सर्वांवर दंगल भडकवण्यासाठी द्वेषपूर्ण भाषण दिल्याचा आरोप आहे.