प्रतिनिधी/कोल्हापूर
लोकांचे मनोरंजन करणाऱया शहरातील केबल ऑपरेटर व्यावसायिकांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी शहरातील केबल ऑपरेटरांची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. 2 ऑक्टोबर या गांधी जयंतीदिनी ऑल इंडिया केबल फेडरेशनने देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला पाठींबा म्हणून जिल्हयातील सर्व केबल बंद राहणार आहे. हा निर्णय केबल ऑपरेटरांच्या कोल्हापूर केबल ऑपरेट सेवाभावी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. या दिवशी शिवाजी पेठेतील गांधी मैदानावर सर्व केबल ऑपरेटर एकत्र येऊन या संपामध्ये सहभागी होणार आहेत.
गेली 25 ते 30 वर्षे जिल्हयातील अनेक केबल ऑपरेटर काम करत आहेत. घरबसल्या लोकांचे मनोरंजन करून घरोघरो सेवा देण्याचे काम करत आहेत. पण त्यांना कोणतीच सुविधा वा सोय नाही. वायरमनांना सर्व सुविधा आहेत, पण केबल ऑपरेटरांना अशा कोणत्याच सुविधा नाहीत. वायर ओढणे, कनेक्शन देणे हे त्यांचे वायरमन सारखे काम आहे. पण त्यांना कोणत्याच सुविधा मिळत नाहीत.
यापूर्वी करमणूक अधिकाऱयांच्या नियमानुसार केबल ऑपरेटरांना काम कलावे लागत होते. परंतु सद्यस्थितीत ट्रायची नियमावली अस्तित्वात आल्याने ही नियमावली त्रासाची ठरत आहे. . पण या अडचणी व तक्रारीचे निवारण करण्यासाटी दिल्लीला जावे लागते.. या आमच्या तक्रारी मांडण्यासाठी कोल्हापूर जिल्हयामध्ये ट्राय अधिकाऱयाची नेमणूक करावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीस अध्यक्ष राजेंद्र साबळे, अजय राऊत, महेश बराले व केबल ऑपरेटर उपस्थित होते. याबाबत स्थानिक खासदारांना निवेदन देण्यात येणार आहे.