छायाचित्रकारांचा ससेमिरा टाळण्यासाठी अजब प्रकार
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच स्टार व्हर्सेस फूडच्या दुसऱया सीझनमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये जान्हवीने तिच्या आयुष्यातील काही मजेदार किस्से सांगितले आहेत. छायाचित्रकारांचा ससेमिरा टाळण्यासाठी एकदा आपण गाडीच्या डिक्कीमध्ये लपल्याचा खुलासा जान्हवीने या शोमध्ये केला आहे.
स्टार व्हर्सेस फूडमध्ये जान्हवी स्वयंपाक करताना दिसून येईल. या शोमध्ये तिची जवळची मैत्रीण आणि ट्रेनर नम्रता पुरोहितही दिसणार आहे. नम्रताने जान्हवी आणि छायाचित्रकारांचा एक किस्सा सांगितला. ‘एक दिवस जान्हवी जिममधून बाहेर पडत असताना तेथे छायाचित्रकार होते, छायाचित्रकारांचा वेढा पडू नये अशी जान्हवीची इच्छा होती. त्यामुळे ती गाडीच्या डिक्कीत लपली’ असे नम्रताने सांगितले आहे.
त्या दिवशी छायाचित्रकारांना वाईट वाटले असेल, ते आमच्यासाठी खूप काम करतात, ते सगळे दुचाकीवरून आमच्या मागे येत होते, माझ्या गाडीत नेहमीच एक ब्लँकेट असते. जेथे मला जाऊ नये अशा ठिकाणी जेव्हा लागते किंवा ज्या व्यक्तीसोबत मी दिसायला नको अशा ठिकाणी मी ते ब्लँकेट वापरत असल्याचे जान्हवीने सांगितले आहे. जान्हवी आता ‘दोस्ताना 2’, ‘गुल लक जेरी’, ‘तख्त’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.