चंदीगढ / वृत्तसंस्था
प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर मोहालीतील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू होते. 66 वषीय सिकंदर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते बऱयाच दिवसांपासून आजारी होते. त्यांची दोन्ही मूत्रपिंडेही निकामी झाली होती. 2016 साली त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रिया झाली होती. त्यापूर्वी त्यांना मधुमेहही जडला होता. त्यातच आता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिकंदर यांच्या मृत्यूनंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘लिजेंडरी पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांच्या मृत्यूमुळे आज पंजाबी संगीत पोरके झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे’, असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच कॉमेडियन कपिल शर्मा, दलेर मेहंदी यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे सरदूल यांच्या निधनाची माहिती देत श्रद्धांजली वाहिली.