वार्ताहर/ औंध
औंध संस्थानच्या अधिपती माजी जि.प.अध्यक्षा , राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा वाढदिवस औंध येथे विविध कार्यक्रमांनी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
औंध शिक्षण मंडळाच्या राजा श्रीपतराव महाविद्यालय, राजा भगवंतराव ज्यू.काँलेज, श्री.श्री.विद्यालय,श्रीमंत हर्षिताराजे राजे इंग्लिश मिडीयम स्कूल, श्री भवानी बालविद्या मंदिर, त्रिमली येथील श्री वाघजाईदेवी विद्यालय, औंध ग्रामपंचायत कार्यालय,विकास सेवा सोसायटी याठिकाणी फिजीकल डिस्टंसिंग पाळून केक कापण्यात आला तसेच ठिकठिकाणी व्रुक्षारोपन करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हणमंतराव शिंदे म्हणाले की, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी औंधसह खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास कामे मोठय़ा प्रमाणात केली आहेत. त्यांनी सामाजिक उन्नतीचा दूष्टीकोन डोळयासमोर ठेऊन शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी मोठे काम केले आहे. एक महिला म्हणून त्यांनी केलेले काम हे अलौकिक आहे. औंधच्या प्रगतीसाठी मागील पंधरा वर्षे त्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. अनेक नवीन वास्तू, शाळा,काँलेजच्या इमारती ,रस्ते, व अन्य कामे मोठय़ा प्रमाणात मार्गी लावली आहेत.त्यामुळे आजच्या पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श डोळयासमोर ठेऊन उन्नती साधावी असे आवाहन करून त्यांनी राणीसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, माजी सभपती संदीप मांडवे, हणमंतराव शिंदे,राजेंद्र माने, आब्बास आतार, सरपंच सोनाली मिठारी, दिपक नलवडे, चेअरमन रमेश बापू जगदाळे, इलियाज पटवेकरे, गणेश देशमुख, अनिल माने,तानाजी इंगळे, सुखदेव इंगळे, प्रदिप कणसे,प्रा.संजय निकम, सचिन शिंदे, शंकरराव खैरमोडे,श्रीकांत भंडारे, एस.बी.घाडगे, एल.टी.जाधव, व्ही.एस.मोरे, एस.व्ही.कुंभार, सी.एस.साळुंखे, सौदामिनी सांगलीकर, संजीवनी देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, औंध शिक्षण मंडळाचे पदाधिकारी फिजीकल डिस्टंसिंग पाळून उपस्थित होते.