साहित्य : 1 वाटी पनीरचे चौकोनी तुकडे, 6 लसूण पाकळय़ा, 1 चमचा व्हिनेगर, 5 ते 6 लाल काश्मीरी मिरच्या, 1 चमचा साखर, चवीपुरते मीठ, 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरं, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा सोयासॉस
कृती : प्रथम लसूण पाकळय़ा, लाल काश्मीरी मिरची, साखर, मीठ, व्हिनेगर आणि दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्सरला लावून पेस्ट बनवून घ्यावी. आता गरम तेलात जिरं टाकून हलक्यावर परतवावे. नंतर त्यात कांदा टाकून हलक्या सोनेरी रंगावर परतवून घ्यावा. आता त्यात सोयासॉस टाकून मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत परतवून घ्यावे. नंतर त्यात पनीरचे तुकडे टाकून दोन ते तीन मिनिटे परतवावे. नंतर त्यावर कोथिंबीर सजवावी. आता तयार गार्लिक पनीर खाण्यास द्यावे.
टीप : काश्मीरी मिरची अथवा इतर उपलब्ध लाल सुकी मिरची वापरण्याआधी त्यातील बी काढून मगच पेस्टसाठी वापरावी.