18 मेपर्यंत 268 गाळय़ांचा लिलाव महापालिकेच्या मुख्य कार्यालयात होणार
प्रतिनिधी /बेळगाव
विविध ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे 12 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. याकरिता दि. 6 मे पासून लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून 18 मेपर्यंत 268 गाळय़ांचा लिलाव करण्यात येणार आहे. दि. 6 रोजी बाजारपेठेतील विविध ठिकाणांच्या 9 गाळय़ांचा लिलाव महापालिकेच्या मुख्य कार्यालयात होणार आहे.
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. यापैकी काही गाळय़ांची भाडेकराराची मुदत दि. 31 मार्च रोजी संपली आहे. तसेच अन्य ठिकाणी असलेले गाळेदेखील भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. लीज संपलेल्या गाळेधारकांना लीज वाढवून हवी असल्यास त्याबाबतचे पत्र मनपाच्या महसूल विभागात देणे बंधनकारक आहे. दि. 6 रोजी 9 गाळय़ांसाठी लिलाव होत असून सकाळी 11 ते 1 दरम्यान मुख्य कार्यालयात अनामत रक्कम भरणा करून लिलावात भाग घेता येईल.
विविध ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या गाळय़ांचा तपशिल
गाळय़ांचे ठिकाण | गाळय़ांचा आकार | अनामत रक्कम | भाडे |
एम. बी. एस. क्रमांक 1 गणपत गल्ली | 377 चौ. फूट | 1 लाख 2 हजार | 8 हजार |
एम. बी. एस. क्रमांक 1 गणपत गल्ली | 301 चौ. फूट | 1 लाख 2 हजार | 6 हजार 400 |
एम. बी. एस. क्रमांक 1 गणपत गल्ली | 164 चौ. फूट | 55 हजार 300 | 3 हजार 600 |
सी. टी. एस. नंबर 4196 कचेरी रोड, बेळगाव | 217 चौ. फूट (पहिल्या मजल्यावर) | 73 हजार 200 | 4 हजार 500 |
सी. टी. एस. नंबर 4196 कचेरी रोड, बेळगाव | 217 चौ. फूट (पहिल्या मजल्यावर) | 65 हजार 520 | 4 हजार |
चव्हाट गल्ली येथील दवाखान्याच्या पहिल्या मजल्यावरील गाळा | 1240 चौ. फूट | 3 लाख 74 हजार 700 | 23 हजार 300 |
सी. टी. एस. क्र. 1752 किर्लोस्कर रोड | 65 चौ. फूट | 22 हजार | 1 हजार 500 |
सी. टी. एस. क्र. 1752 किर्लोस्कर रोड | 96 चौ. फूट | 32 हजार 500 | 2 हजार 100 |
हिंदवाडी हणमशेट बिल्डिंग | 8 हजार 21 चौ. फूट |