पालिकेच्या अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
सरदार्स मैदानावरील गाळय़ांचा लिलाव करण्याआधी पायाभूत सुविधा पुरवा, अशी मागणी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी केली आहे. यासंबंधी महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना एक निवेदनही देण्यात आले आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील, दुर्गेश मेत्री आदींनी पालिका अधिकाऱयांना निवेदन दिले आहे. व्यापारी संकुलातील गाळय़ांचा लिलाव करण्याआधी पायाभूत सुविधा पुरवा, लाईट, इतर दुरुस्ती, करण्याबरोबरच कॉलेज रोडवर नवे गेट सुरु करा, सुविधा पुरविण्याआधी लिलाव करु नये, अशी मागणी करण्यात आली असून नवहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.