पुढील आठवडय़ात राबविणार मोहीम, थकबाकीदारांना मिळाली मुदत
बेळगाव / प्रतिनिधी
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी भाडे थकविल्याने टाळे ठोकण्याची धडक मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यामुळे महात्मा फुले भाजीमार्केटमधील आणखीन तीन गाळेधारकांनी भाडय़ाची रक्कम जमा केली आहे. तसेच शुक्रवारी आणखीन एका व्यापारी संकुलातील गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात येणार होती. मात्र कार्यालयीन कामकाजामुळे ही कारवाई रद्द झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेची क्यापारी संकुलातील गाळेधारकांनी मागील दोन ते तीन वर्षापासूनचे भाडे भरले नाही. त्यामुळे मनपाचा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे मनपाच्या खजिन्यात ठणठणाट आहे. विकासकामे राबविण्यास आर्थिक अडचण भासत असल्याने थकबाकी वसूल करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. त्यामुळे गाळेधारकांकडील थकबाकी वसुल करण्यासाठी टाळे ठोकण्याची धडक मोहीम मागील 15 दिवसांपासून राबविण्यात येत आहे. मटण मार्केटच्या पाठोपाठ भाजी मार्केटमधील गाळय़ांना टाळे ठोकण्यात आल्याने गाळेधारकांनी भाडे भरण्यास प्रारंभ केला आहे. या कारवाईमुळे मनपाच्या खजिन्यात 40 लाखाचा महसूल जमा झाला आहे. महसूल वसुलीसाठी शहरातील आणखीन एका व्यापारी संकुलातील गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई शुक्रवारी करण्यात येणार होती. मात्र कार्यालयातील कामकाजामुळे ही कारवाई रद्द करण्यात आली. मात्र पुढील आठवडय़ात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गाळेधारकांनी थकबाकी भरण्यासाठी चार दिवसाचा अवधी उपलब्ध झाला आहे. पुढील आठवडय़ापर्यंत थकबाकी न भरल्यास कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्मयता आहे.