देवीच्या मंदिर प्रांगणात प्रथम तर रवळनाथ मंदिर प्रांगणात दुसरी बैठक : उत्सवाची तयारी जोरात
डिचोली/प्रतिनिधी
गावकरवाडा डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मंदिरात श्री शांतादुर्गा ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे सोम. दि. 13 डिसें. रोजी होणाऱया नवा सोमवार उत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे पोहोचली आहे. या उत्सवात दरवषीप्रमाणे यावषीही नामवंत गायकांच्या संगीत मैफलींचा आस्वाद घेण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे.
सकाळी मंदिरात विविध धार्मिक विधी झाल्यानंतर भाविकांना रात्रीपर्यंत देवीचे दर्शन घेण्याची संधी दिली जाणार. रात्री 9 वा. मंदिरात देवीची पालखी सजविण्यात आल्यानंतर गाराणे घालून देवीच्या जयघोषाने शांतादुर्गा भजनी मंडळ, भांबर्डे तसेच हनुमान बँड पथक यांच्या सहभागाने, दारूकामाच्या आतषबाजीत पालखी मिरवणुकीला मंदिरातून बाहेर पडणार आहे. पालखी गावकरवाडा येथे फिरून मंगळवारी पहाटे पुनश्च मंदिरात प्रवेश करणार आणि या उत्सवाची सांगता होणार आहे.
या उत्सवानिमित्त दरवषी गावकरवाडा येथे नामवंत गायक कलाकारांच्या संगीत मैफलींचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली मैफल रात्री 10 वा. गावकरवाडा येथील देवीच्या प्रांगणात होणार आहे. “स्वर सुमनांचे झेले” या नाटय़गीत, भावगीत, भक्तिगीत गायनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या बहारदार कार्यक्रमात प्रसिध्द गायक श्री जसराज जोशी (पुणे) व गायिका सौ. मनिषा निश्चल (मुंबई) आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूरनिवेदन टिव्ही व आकाशवाणी निवेदिका वर्षा मळीक या करणार आहेत.
या उत्सवातील दुसरी संगीत मैफल पहाटे 1.30 वा. देव श्री रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. “गुंफिले स्वर फुले” या बहारदार नाटय़, सुगम, भक्तिगीतांच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक श्री अभिषेक मारोतकर (मुंबई) व गायिका तनिषा मावजेकर (गोवा) या आपली कला सादर करणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन संगीता जोशी (मुंबई) या करणार आहे.
कोमुनिदाद सभामंडपात रांगोळी स्पर्धा
या उत्सवानिमित्त गावकरवाडा येथील देवीच्या मंदिरासमोरील कोमुनिदाद सभामंडपात राज्यस्तरीय व डिचोली नगरपालिका मर्यादित अशा दोन खुल्या गटात रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. रांगोळी घालण्यासाठी रवि. दि. 12 डिसें. रोजी संध्या. 7 ते रात्री 11 पर्यंत व सोम. दि. 13 रोजी सकाळी 8 ते दु. 12 असा वेळ दिला जाईल.
स्पर्धेत राज्यस्तरीय गटातील विजेत्यांना पहिले रू. 3000/-, दुसरे रू. 2000/-, तिसरे रू. 1000/- व चार रू. 500/- ची उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार. डिचोली नगरपालिका मर्यादित गटातील विजेत्यांना पहिले रू. 3000/-, दुसरे रू. 2000/-, तिसरे रू. 1000/- व तीन रू. 500/- ची उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार. या विजेत्यांना दि. 20 डिसे. रोजी गवळण काल्याच्या दिवशी विशेष सोहळय़ात बक्षिसे वितरीत केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी अर्जुन परब (6422064652) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.