कुणबी भवनासह, एकजुटीवर चर्चा
प्रतिनिधी / संगमेश्वर
आंबेडखुर्द येथील कुणबी भवनासाठी शेणवडे येथे साडेबहात्तर खेड्यातील गावकर एकत्र येऊन चर्चा विनिमय केली. ११ वर्षांनंतर प्रथमच सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत विचारविनिमय केला. कुणबी भवन बांधण्यासाठी व परंपरा जतन करण्यासाठी गावकर परिषद आयोजित करण्यात आली होती.
शेणवडे येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच गावकर परिषदेला सर्व गावकरांचा सत्कार करण्यात आली. तसेच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.