गावकारभारी आज होणार निश्चित
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सकाळपासून ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणी करण्यासाठी कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले. जिह्यात 11 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गुलाल कोणाच्या अंगावर पडणार अन् कोणाला पराभवाला सामोरे जावे लागणार याकडे नजरा लागल्या असून त्यामुळे गावकारभारी कोण यावर सोमवारी शिक्कामोर्तब होणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मिरवणुका काढणाऱयांवर प्रशासनाकडून करडी नजर असणार आहे.
सातारा जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक अटीतटीची झाली. या निवडणुकीवरुन अनेक ठिकाणी वादंग निर्माण झाले होते. त्यामुळे गावागावात नक्की कोण निवडून येणार हे प्रत्यक्षात सोमवारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होत आहे.
जिल्हय़ात प्रत्येक तालुक्याची मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. सातारा तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी छत्रपती शाहु क्रीडा संकुलात, कोरेगाव तालुक्यातील इंडोअर स्पोर्टस हॉल डी. पी. भोसले कॉलेज, जावली तालुक्यातील जावली तहसील कार्यालयात, वाई तालुक्यातील वाई तहसील कार्यालयात, महाबळेश्वर येथील तहसील कार्यालयात, खंडाळा येथील किसनवीर सभागृह पंचायत समिती खंडाळा येथे, फलटण तालुक्यातील शासकीय धान्य गोदाम फलटण येथे, माण तालुक्यात नवीन शासकीय गोदाम दहिवडी येथे, खटाव तालुक्यातील नवीन प्रशासकीय इमारत वडूज, कराड तालुक्यात रत्नागिरी शासकीय धान्य गोदाम भेदा चौकात, पाटण तालुक्यात बाळासाहेब देसाई कॉलेजच्या क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. त्याकरीता प्रशिक्षण देण्यात आले.
सातारा तालुक्यातील 89 ग्रामपंचायतींचे 16 टेबलवर होणार मतमोजणी
सातारा तालुक्यातील मतमोजणी ही अठरा टेबलवर आठ फेऱयात होणार आहे. टेबल एकवर समर्थगाव, सासपडे, शेंद्रे, वळसे, यवतेश्व. टेबल क्र. 2 वर निगडी तर्फ सातारा, कण्हेर, गवडी, संगममाहुली, कारंडवाडी, गजवडी. टेबल क्रमांक 3 वर पांगारे, शेळकेवाडी, डोळेगाव, परळी, सोनापूर, निसराळे, वेचले. टेबल क्रमांक 4 पिलाणी, बोरगाव, फत्यापूर, फडतरवाडी, वर्ये, वेळे, नागेवाडी. टेबल क्रमांक 5 सोनगाव सं निंब, वावदरे, कळंबे, नागठाणे. टेबल क्रमांक 6 वर खोडद, पाडळी, मांडवे, निनाम, अतित. टेबल क्रमांक 7 वर समर्थनगर, माजगाव, लांडेवाडी, वेणेगाव, कुसवडे, मापरवाडी, डबेवाडी. टेबल क्रमांक 8 वर सांबरवाडी, आवाडवाडी, वर्णे, अंगापूर वंदन. टेबल क्रमांक 9 तासगाव, चिंचणेर वंदन, नेले, कोंडवे. टेबल क्रमांक 10 हामदाबाज, सारखळ, वासोळे, वाढे, बसाप्पाचीवाडी. टेबल क्रमांक 11 महागाव, गोवे, आंबळे रायघर, ठोसेघर, खडगाव, लावंघर. टेबल क्रमांक 12 वर करंडी, पोगरवाडी, पेट्री अनावळे, कोडोली. टेबल क्रमांक 13 वर धनगरवाडी, मुग्दुलभटाचीवाडी, राकुसलेवाडी, कुमठे, पाटेश्वरनगर, धनगरवाडी. टेबल क्रमांक 14 वर जावळवाडी, किडगाव, नुने, इंगळेवाडी, आगुंडेवाडी, सैदापुर. टेबल क्रमांक 15 वर शिवथर, वनगळ, यादववाडी, सोनवडी, चिखली. टेबल क्रमांक 16 वर रेवंडे, निगुडमाळ, काळोशी, शिंदेवाडी, दरे तर्फ परळी, परमाळे, नांदगाव, भैरवगड यांची मतमोजणी होणार आहे.