अधिकाऱयांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱयांची सूचना
प्रतिनिधी बेळगाव
अबकारी, पोलीस, महसूल, वनखात्याच्या अधिकाऱयांनी संयुक्तपणे कारवाई करून गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शुक्रवारी अधिकाऱयांना केली.
जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत अबकारी, आरटीओ, वनखाते, पोलीस, समाजकल्याण, सार्वजनिक शिक्षण खाते आदी शासकीय अधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीत खास करून पोलीस आणि वनखात्याच्या अधिकाऱयांनी संयुक्तपणे जंगल परिसरात छापे टाकून अड्डे उद्ध्वस्त करण्याची सूचना केली.