प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील बैलबाग परिसरात अवैधरित्या गावठी दारू विकली जात अल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े याप्रकरणी शहर पोलिसांकडून दोघा संशयिताना अटक करण्यात आल़ी रविवारी रात्री 8 च्या सुमारास पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल़ी
स्वप्नील सुनील गिते (ऱा बैलबाग रत्नागिरी) व लिलाधर रघुनाथ तरळ (43, ऱा माळनाका रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ शहरातील बैलबाग परिसरात अवैधरित्या गावठी दारू विकली जात असल्याची गुप्त बातमी शहर पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार रविवारी रात्री 8 च्या सुमारास पोलिसांकडून याठिकाणी छापा टाकण्यात आल़ा यावेळी संशयित आरोपी हे गावठी दारूची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल़े याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक पाटील करत आहेत़