मांसासह दूधाचेही करत नाहीत सेवन
जगात अनेक लोक मांस तर खात नाही नाही, याचबरोबर ते दूग्धजन्य पदार्थांचाही वापर करत नाहीत. अशा लोकांना आणि त्यांच्या डायटला वीगन म्हटले जाते. सद्यकाळात वीगन एक मोहीम ठरली असून याद्वारे लोक इतरांना देखील प्राण्यांपासून तयार होणाऱया उत्पादनांचा त्याग करण्यासाठी जागरुक करत असतात. जगात एक असे गाव आहे, जेथे राहणारा प्रत्येक व्यक्ती शुद्ध शाकाहारी आहे.
इसायलच्या नेवे शैलॉममध्ये डिमोना नावाचे एक छोटे गाव आहे. या गावात 3000 आफ्रिकन हिब्रू इस्रायली लोक राहतात. या गावातील लोक मागील 50 वर्षांपासून शुद्ध शाकाहारी आहेत. या गावातील प्रत्येक इसम वीगन आहे. येथे चिकन, मटण, मासे इत्यादींचा आहारात समावेश केला जात नाही. तसेच येथे दूधाचाही वापर केला जात नाही.
मीठ देखील वर्ज्य
मांस आणि दूधासह डिमोन गावातील लोक आठवडय़ातील 3 दिवस मीठ देखील खात नाहीत तसेच वर्षातील 4 आठवडे साखरेचा आहारात समावेश करत नाहीत. त्यांचे जेवण अत्यंत साध्याप्रकारचे असते. ऍडम आणि ईव्ह देखील शाकाहारी होते असे हिब्रू इस्रायलींचे मानणे असल्यानेच ते मांसाहारी नाहीत. येथील लोक शरीराला मंदिराप्रमाणे पवित्र मानतात आणि त्याला मांस किंवा मसाल्यांद्वारे अपवित्र करू इच्छित नाहीत.
शरीराची घेतात काळजी
डिमोना गावाती लोक स्वतःच्या शरीराची सर्वप्रकारे काळजी घेतात. मांसासह येथील लोक मद्य तसेच सिगारेटपासूनही लांब राहतात. आठवडय़ात तीनवेळा लोक व्यायाम करतात. तसेच दर महिन्याला शरीराचा मसाज करविला जातो. शरीराची काळजी घेतली जात असल्यानेच येथील लोकांना पाहून त्यांच्या वयाचा अंदाज बांधणे अवघड आहे.