प्रतिनिधी/ पेडणे
ला?कडाऊनमुळे गोवा राज्यात लाखो परप्रांतिय मजूर विविध क्षेत्रात मंजूरीचे काम करत आहेत. कोरोना या महाभंयकर रोगाने जगभरात आणि भारत देशातही थैमान घातल्याने या महामारीची झळ सर्वच क्षेञा?ना पोचली. गोवा राज्यात विविध क्षेत्रात काम करत असलेल्या या मजुरांना आता आपल्या मुळ गावी आपल्या कुटुंबियाकडे जाण्याची ओढ लागली असून हे मजूर आता आपण काम करत असलेल्या मालकांच्या आदेशाला न जुमानता त्यांना आपल्या घरी जाण्याचे वेध लागले आहे. पेडणे तालुकात रेती कामगार , बांधकाम व्यवसाय ,रस्ते कामगार, तसेच विविध व्यवसायात हजारे बिगर गोमंतकीय बिहार , कर्नाटक , उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्र आदी राज्यातील मजूर काम करत असून पेडणे तालुक्मयातील वीसही ग्रामपंचायती मधून व पेडणे पालिका क्षेञातून साडेदहा हजार मजूरानी आपली नावे नोंदणी केली आहे.
ड़ पेडणे तालुक्मयातील वीस ग्रामपंचायती व एक नगरपालिका क्षेत्रात मिळून साडे हजार नोंदणी
पेडणे तालुक्मयात रेती मजूर बांधकाम क्षेञ , रस्ता व अन्य क्षेत्रात काम करणारे हजारोच्या संख्येने मजूर आहेत.या मजूरानी आता आपल्या गावी जाण्यासाठी सरकार दरबारी अर्ज भरून नोंदणी केली असून आतापर्यत पेडणे तालुक्मयातील वीसा पंचायतीकडे साडे दाहा हजार नोंणी झाली असल्याची माहिती पेडणे तालुका गटविकास अधिकारी श्री केदार यांनी दिली.
ड़ सर्वाधिक मजूर हे रेती व्यवसायावर काम करणारे
पेडणे तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात रेती व्यवसाय असून या व्यवसायात काम करणारे हजारो रेती कामगार हे बिहार , उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , कर्नाटक आदी राज्यातील आहेत या मजुरांना सध्या आपल्या कुटुंबियाची ओढ लागली असून ला?कडाऊन काळात रोजगार बंद झाल्याने हे मजूर आर्थिक कमाई नसल्याने तसेच रोजगार नसल्याने त्याचे मालकही त्यांना पैसे देत नसल्याने त्यांनी आता आपल्या गावी जाण्याचा रस्ता धरला आहे.
ड़ आम्हाला आमच्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे सोडा , पोरस्कडे पंचायती जवळ जमले शेकडो रेती कामगार , चालत महाराष्ट्र राज्यात जाण्याची तयारी
शुक्रवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान धईबाग पोरस्कडे , तोरसे तसेच इतर भागातील सुमारे शेकडो रेती कामगार पोरस्कडे पंचायत कार्यालया जवळ जमा झाले. हे कामगार चालत या ठिकाणी आले . आणि महाराष्ट्रात राज्यात चालत जाण्यासाठी निघत असताना ही माहिती पेडणे पोलिसांना मिळाल्यानंतर पेडणे पोलीसांनी त्यांना पोरस्कडे येथे आडविले.
ड़ हे रेती कामगार बिहार , उत्तर प्रदेश राज्यातील तसेच इतरही राज्यातील होते आम्हाला बिहार राज्यात जाण्यासाठी रेल्वेची सोय करा अशी मागणी यावेळी या कामगारांनी पञकारांकडे बोलताना केली.
ड़ बिहारचे मुख्यमंञी नितीश कुमार यांनी आम्हाला आमच्या राज्यात न्यावे अशी जोरदार मागणी यांनी करत आम्ही भुके आहोत आम्हाला न्याय द्या आमच्याकडे पैसे नाहीत आम्हाला घरी न्या अशी मागणी त्यांनी केली.
ड़ रेती मजूर यांचा गोंधळ , बिगर गोमंतकीय मजूर अफवामुळे सैरभैर
शुक्रवारी गोव्याच्या विविध भगातून शेकडे मजूर हे महाराष्ट्र राज्यात जाण्यासाठी निघाले.यात वेर्णा येथूनही हे मजूर पायी चालत राष्ट्रीय महामार्गाने आले तर काहिजण चोरवाटेने आले. गोव्यातून टेन नाही , महाराष्ट्र राज्यातून टेन सोडणार अशी अफवा पसरल्याने व प्रत्येक जण वेगवेगळय़ा पध्दतीने त्यांना सांगत असल्याने हे मजूर सैरभैर झाले. आणि त्यांनी महाराष्ट्रात जाण्याचा रस्ता धारला .
ड़ पेडणे तालुक्मयात किनारी भागात हरमल पंचायत क्षेत्रात सर्वाधिक परप्रांतिय कामगार
पेडणे तालुक्मयात हरमल पंचायत क्षेत्रात आतापर्यंत 2130 परप्रांतिय मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी नोंदणी केली आहे. यात हा?टेल्स , श?क, , विविध आस्थापने यांच्यावर काम करत असलेले हे मजूर तसेच व्यवसायिक ओडिशा,पश्चिम बंगाल, केरळ , कर्नाटक , बिहार आदी राज्यातील आहेत.
ड़ पेडणे तालुक्मयातील वीस पंचायत क्षेत्रातील साडेदहा हजार नोंदणी केलेल्या मजुरांची संख्या.
आगरवाडा -चोपडे पंचायत क्षेत्रातील 877, हळर्ण 81, हरमल 2130, कासरवर्णे 142,चांदेल हसापूर 53, कोरगाव 477, धारगळ 773,इब्रामपूर हणखणे 275, खाजने अमेरे पोरस्कडे 769, मांदे 963, मोरजी 1290, वजरी 374, पालये 195, पार्से 272,केरी तेरेखोल 193, तांबोसे मोप उगवे 44,तोरसे 483, तुये 485,विर्नोडा 356, वारखंड नागझर 158 मिळून सुमारे साडे दहा हजार नोंदणी करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी श्री केदार यांनी दिली.
याशिवाय पेडणे पालिकेकडे 90 मजुरानी तर पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी कार्यालयात मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी 38 जणांनी नोंदणी केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी दिली.
ड़ रेती कामगार तासेच बांधकाम व्यवसायाशी निगडीत कामगार गावी जात असल्याने मालकाना चिंता
ला?कडाऊनमुळे सुमारे चाळीस दिवस विविध व्यावसाय हे बंद होते. केंद्र सरकारने ला?कडाऊन नियम शिथिल केल्याने आणि विविध व्यवसायाना काही प्रमाणात व्यवसाय सवलत दिल्याने आता पावसाळय़ाच्या तोंडावर सर्व कामे हाते वेगळे करण्याचा व्यवसायिकाचा कल होता.माञ रेती व्यवसाय हा पूर्णपणे बिहार , उत्तर प्रदेश, कर्नाटक आदी राज्यातील मजुरांवरा अवलंबून असल्याने आता या कामगारानी आपल्या गावी जाण्याचा हट्ट धरल्याने मालकांची चिंता वाढू लागली. सध्या मुख्य मौसम असल्याने बांधकाम तसेच अन्य क्षेत्रातील व्यवसाय मे महिन्यात तेजीत असतात.याच दरम्यान जादा कमाई हे व्यवसायिक करतात माञ हे सर्व कामगार आता गावी जाण्यास तयार असल्याने त्यांचे लक्ष आता कामाकडे नसून त्यांना आपल्या घरीची ओढ लागली आहे.
ड़ परप्रांतिय मजुरांनी तोरसे येथे अडविला राष्ट्रीय महामार्ग , गोव्याच्या विविध भागातून आले मजूर परप्रांतिय मजुरांनी शुक्रवारी दुपारी तोरसे येथे जालत मुबंईला जाण्यासाठी निघालेल्या मजुरांनी तोरसे येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.व रस्त्यावर ठाण मारून तसेच काही मजुरांनी रस्त्यावरझोपून सारकारचा निषेध करत आम्हाला आमच्या गावी पाठवा अशी जोरदारा मागणी केली.हे मजूर फहाटे पासून गोव्याच्या विविध भागातून चालत मुंबईला तृसेच आपल्या राज्यात जाण्यासाठी निघेले. दुपारी तोरसे येथे राष्ट्रीय महमार्गावर अखेर या मजुरांनी वाहतुक रोखून धारली.