प्रतिनिधी/ मौजे दापोली
दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील भैरी मंदिरातील दानपेटी चोरटय़ांनी फोडून सुमारे पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी सात वाजता ग्रामस्थ मंदिरातील आरती आटोपून देऊळ बंद करून आपापल्या घरी गेल्यानंतर सायंकाळी साडेसात ते रविवारी सकाळी सात वाजण्याच्या कालावधीमध्ये चोरटय़ांनी मंदिराच्या मुख्य दाराचा व गाभाऱयाच्या दाराचा कडीकोयंडा तोडून दानपेटी फोडून दानपेटीत जमा असलेली सुमारे पंधरा हजार रुपयांची रोकड चोरटय़ांनी लांबवल्याची तक्रार शंकर काशीराम साळवी यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.