ऑंनलाईन टीम / नवी दिल्ली
गिरीश कुबेर यांनी “रीनैसंस द स्टेट” या पुस्तकामध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयरबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले असुन तो आक्षेपार्ह मजकूर लवकरात लवकर मागे घ्य़ावा, अशी मागणी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
खा. संभाजीराजे यांनी आपल्या पत्रात पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध केला आहे. तसेच वाचकापर्यंत चुकीची माहिती जाण्यापुर्वी पुस्तकाची प्रत्येक प्रत मागे घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान सर्वश्रुत आहे. तसेच विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी, किंवा खोडसाळपणा करुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी अश्या प्रकारचे संदर्भहीन लिखाण केले आहे. तसेच “रीनैसंस द स्टेट”या पुस्तकावर संपुर्ण देशभर कायमची बंदी घालावी याचबरोबर बाजारत विक्रीसाठीची ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत. सरकारने या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई त्वरीत करावी. असे ही त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.