लंडन : हुकमी स्ट्रायकर ऑलिव्हर गिरोड आणि गोलरक्षक विली कॅबालिरो यांच्याबरोबर झालेल्या करारामध्ये चेल्सी फुटबॉल क्लबने वाढ केली आहे. फ्रान्सचा 33 वर्षीय ऑलिव्हर गिरोड याचा चेल्सी बरोबरचा करार चालू वर्षीच्या फुटबॉल हंगामापर्यंत करण्यात आला होता.
गेल्या मार्चमध्ये प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत झालेल्या सामन्यात चेल्सीने एव्हर्टनचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला होता. गिरोडने चेल्सीतर्फे गोल नोंदविला होता.
या सामन्यानंतर कोरोनामुळे प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्यात आली. चेल्सी क्लबच्या अधिकाऱयांनी गिरोडला आणखी एका वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जेंटिनाच्या कॅबालिरो बरोबरच्या करारामध्ये चेल्सीने आणखी एका वर्षांसाठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.