बांदा/प्रतिनिधी-
मठ वेंगुर्ले येथील गीतेश गावडे या युवकाचा २३ जुलैला गाळेल येथे डोंगर कोसळून त्याखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.या युवकाच्या कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत मिळवून द्यावी यासाठी बांदा सरपंच अक्रम खान यांनी आ.नितेश राणे यांची भेट घेत मागणीचे निवेदन आ.राणे यांना दिले.
कै. गीतेश गोपाळ गावडे हा युवक गोवा येथे कामाला जात असताना गाळेल येथील डोंगर कोसळून त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.घरातील कमावता मुलगा गेल्याने या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाकडून मिळवून द्यावी यासाठी आज सरपंच अक्रम खान आ.नितेश राणे यांची भेट घेतली.