गुंजी / वार्ताहर
गुंजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे गावात चौकाचौकात चर्चेला उधाण आले असल्याचे दिसून येत आहे. गुंजी ग्राम पंचायतीमध्ये 7 जागांसाठी 25 जण रिंगणात उतरले होते. गुंजी ग्राम पंचायतीमध्ये एकूण 7 वार्ड असून 12 सदस्य संख्या आहे. त्यापैकी गुंजी वार्ड क्रमांक 2 मधून एक उमेदवार; भालके वार्डमधून एक उमेदवार, शिंपेवाडी वार्डमधून एक उमेदवार, तर किरावळा -आंबेवाडीमधून दोन उमेदवार असे एकूण तीन वार्डमधून पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित 4 वार्डमध्ये निवडणूक होऊन या 4 वार्ड मध्ये सात जागांसाठी 25 उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीमध्ये 5 माजी ग्रामपंचायत सदस्यांनी आपले पुन्हा नशीब अजमाविले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुंजी गावातील वार्डक्रमांक 1 मध्ये मोठय़ा चुरशीने निवडणूक झाली असून यामध्ये एक सामान्य जागेसाठी चार पुरुषानी तर सामान्य महिला एक जागेसाठी तीन महिलांनी चुरशीने निवडणूक लढविली आहे. त्यामुळे या निकालाकडे एक वेगळय़ाच नजरेने पाहिले जात आहे. कारण चार पुरुषामध्ये एक जागेसाठी तर तीन महिलांमध्ये एका जागेसाठी अशी लढत असून एखाद्या वेळेस दोन्ही महिलांनी जर पुरुषापेक्षा उच्चांकी मते घेतली तर दोन्ही पुरुष बाजूला जाण्याची शक्मयता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात असल्याने पुरुषातील उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. कारण सामान्य महिलांच्या तिन्ही उमेदवारांनी अत्यंत चुरशीने निवडणूक लढविली असून त्यांनी जर पुरुषापेक्षा जास्त मते घेतली तर त्या नक्कीच त्यांच्यापेक्षा सरस ठरून महिलाराज येण्याची शक्मयताच दाट असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर ब गटातही एक जागेसाठी पाच जणानी आपले नशीब आजमावले असून त्यामध्ये एक माजी अध्यक्ष तर एक माजी सदस्य यांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडीची मोठी उत्कंठा लोकांना लागून राहिली आहे. तसेच संगरगाळी मध्येही एक सामान्य जागेसाठी चौघांनी निवडणूक लढविली असली तरी दोन धनदांडग्यामध्ये मोठय़ा चुरशीने निवडणूक झाल्याने या निकालाकडे ही या गावाबरोबरच गुंजी गावाच्या लोकांच्याही नजरा लागलेल्या आहेत. तर कामतगामध्येही एक माजी सदस्यासह चुरशीने निवडणूक झाली असल्याकारणाने पूर्ण गावचे लक्ष या निकालाकडे लागल्याने निकालाची हूरहूर सर्वानाच लागून राहिली असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.