गुंजी / वार्ताहर
दरवषीच्या प्रथेप्रमाणे गुंजीत सीमोल्लंघन करून पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आदेशाचे पालन करीत येथील श्री माऊली देवीची पालखी दुपारी गावातून सवाद्य मिरवणुकीने उत्तरेकडील सीमोल्लंघनस्थळी पोहोचली. त्या ठिकाणी पंच, पुजारी, मानकऱयासमवेत पुरोहिताकरावी धर्मिक विधी पार पडल्यानंतर सीमोल्लंघन करण्यात आले व सोने लुटण्यात आले. त्यानंतर पालखी माऊली मंदिराकडे येऊन मंदिराला पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी फुले, बर्फी, लाडू, पेढे यांची पालखीवर मुक्त उधळण केली. त्यानंतर सुशोभित बैलजोडय़ा फिरवण्यात आल्या.
अमाप श्रद्धेचा अविष्कार
कोरोना महामारीचे कारण पुढे करुन गुंजी पंचायतीने गुंजी पंचक्रोशीतील गावागावात यावषीचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याचे प्रसिद्ध केले होते. तसेच प्रसिद्धी माध्यमातूनही त्याप्रकारे पंच कमिटीच्यावतीने आवाहन करण्यात आले होते. मात्र माऊली देवी ही अत्यंत जागृत देवी असा लौकिक सर्वदूर असल्याने आणि देवीवरील अमाप श्रद्धेपोटी या पालखी सोहळय़ास गुंजी माऊली कर्यादीतील बऱयाच भाविकांनी सामाजिक अंतर आणि मास्क या नियमांचे पालन करीत बऱयाच भाविकांनी हजेरी लावली होती. आणि हा सोहळा उत्साहात संपन्न होण्यास सहकार्य केले.
यात्रास्थळी सन्नाटा
पालखी सोहळय़ानंतर दुसऱया दिवशीपासून या यात्रोत्सवास सुरुवात होते. मात्र यावषी मंदिर परिसरात दुकाने किंवा कोणतीच करमणुकीची साधनेही नसल्याने शिवाय भाविकांचा महापूरही नसल्याने या परिसरात सन्नाटा पसरल्याचे दिसून येत होते. मात्र सोमवारी उशिराने मंदिर परिसरात तुरळक गर्दी दिसून येत होती. भाविकांचे मंदिरातील सर्व धर्मिक विधी सध्या बंद केले असल्याने तसेच मुख्य मंदिरातील प्रवेश बंदीमुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बाहेरूनच दर्शन घेऊन परतावे लागत आहे.