प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील गुंड मनोज बक्कु मिठापुरे (वय 39, रा. आझादनगर, मोळाचा ओढा, सातारा) यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्याखाली एपीडीए एक वर्षासाठी स्थानबद्धतेचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढला आहे. ही जिल्हय़ातील सलग तिसरी कारवाई असून ती मोठी कारवाई मानली जात आहे.
मनोज मिठापुरे याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्राचा वापर, शासकीय कामात अडथळा आणणे, लोकसेवकास धक्काबुक्की करणे, अनाधिकाराने प्रवेश करून मारहाण करणे, अवैध मटका व्यवसाय असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या महिन्यात जंबो कोविड रुग्णालयाबाहेर एकास बेदम मारहाण झाली होती. या गुह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाला.
शाहुपुरीचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी पोलीस निरीक्षक अमितकुमार बन्सल यांच्यामार्फत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे ’एमपीडी’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला जिल्हाधिकाऱयांनी हिरवा कंदील दिला. ’एमपीडी’अंतर्गत जिल्हाधिकारी यांची ही सलग तिसरी कारवाई आहे. दरम्यान, या अगोदर देखील शाहुपुरी पोलीस ठाण्याकडून यापूर्वी 2017 मध्ये या मनोज मिठापुरे याच्यावर एक वर्षे तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईचा प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, यादव व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी परिश्रम घेतले.