ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महत्त्वाच्या तारखा, दिनविशेष, अनेक दिग्गज, त्यांचे योगदाना सलाम करण्यासाठी गुगलकडून नेहमीच रंगीबेरंगी डुडल तयार केले जाते. मात्र, सध्या देशात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अशा परिस्थितीत सर्व डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी जोखीम पत्करून काम करत आहेत. याच निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या या खास लोकांसाठी गूगलने डूडलच्या माध्यमातून विशेष आभार मानले आहेत. कोरोना लढ्यात लढणाऱ्या या डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना सलाम करत गूगलने खास ‘थक्यू’ म्हणणारे डूडल तयार केले आहे.
या डूडलवर कर्सर नेल्यावर To all doctors, nurses and medical workers, thank you असा मेसेज येत आहे.
या खास डूडल मध्ये खास वरच्या बाजूला एक हार्ट म्हणजेच हृदयाचा ईमोजी दिसत आहे. या संकटाशी दोन हात करणाऱ्या, लढा देणाऱ्यांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा ईमोजी वापरण्यात आला आहे.
जगभरात विविध लोक, संस्था एकमेकांना मदत करण्यास पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याचबरोबर गुगल कडून सांगण्यात आले की, या संकटाच्या काळात काम करणाऱ्या सर्वांच्या कामाची नोंद घेण्यासाठी गुगल कडून खास डूडल सिरीज लॉन्च करण्यात येत आहे.
या सिरीज च्या माध्यमातून कोरोना व्हायरस हेल्पर्स ना सलाम करण्यात येणार आहे. आगामी काळात अशा प्रकारचे खास डूडल तयार केले जातील.