वृत्तसंस्था/ नवी दिल्ला
जगातील प्रसिद्ध सर्च इंजिन असणाऱया गुगलने प्ले स्टोअर डेव्हलपर्ससाठी नवीन sंग्ग्ऱिहएम्aह ऍप सादर केले आहे. सदरच्या ऍपचे वैशिष्टय़ म्हणजे इंटरनेट जोडणी शिवाय अन्य उपकरणांचा वापर करणे सोपे होणार आहे.
ऍप वायफाय अवेअर प्रोटोकॉलचा वापर करुन दोन स्मार्टफोनच्या दरम्यानचे अंतरही मोजण्याचे संकेत आहेत. sंग्ग्ऱिहएम्aह ऍप विशेष करुन डेव्हलपर्स, विक्रेते आणि विद्यापीठांसाठी संशोधन, प्रात्यक्षिक तसेच चाचणी साधनांच्या आधारे डिझाईन करण्यात आले आहे.
ब्लूटय़ूथच्या तुलनेत वायफाय अवेयर नेटवर्क कनेक्शन अधिक लांब पल्ल्याचे कनेक्शन स्विकारणारे आहे. या प्रकारच्या कनेक्शनवर ऍपचा वापर करुन मोठय़ा प्रमाणात ग्राहक डाटा शेअर करत असतात, उदा ः फोटो शेअरिंग ऍपचा वापर.
1 ते 15 मीटरपर्यंत करणार काम
गुगलने दिलेल्या माहितीनुसार सदरच्या ऍपवर जवळपास 15 मीटरपर्यंतची उपकरणे आपल्यासोबत जोडली जाऊ शकतात. यामध्ये डेव्हलपर्स, ओईएम आणि संशोधनकर्ते यांना या साधनांचा वापर उपयुक्त ठरणार आहे.
काय आहे वायफाय अवेयर?
वायफाय अवेयर ऱाग्gप्ंद Awarाहे ऱैदक्ग्हु (एनएएन) च्या स्वरुपात ओळखले जाते. हे प्रोटोकॉल अँड्राईड 8.0 आणि त्याच्यावर ओएस व्हर्जनची सर्व उपकरणांसोबत काम करु शकतील.