वृत्तसंस्था / वॉश्ंिग्टन :
सर्च इंजिन गुगलने चीनशी संबंधीत असणारी जवळपास 2500 यूटय़ूब चॅनेल्स काढून टाकली आहेत. सदरची चॅनेल्स ही अनावश्यक माहितीचा प्रसार करत आहेत. तसेच माहितीही खोटय़ा स्वरुपाची प्रसारीत करीत असल्याची कारणे दाखवत गुगलने ही कारवाई केल्याची माहिती गुगलनेच दिली आहे. यामध्ये व्हीडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर यूटय़ूबवर भ्रम निर्माण करणाऱया गोष्टींचा मोठय़ा प्रमाणात प्रसार केल्याची माहिती आहे.
गुगलने दिलेल्या माहितीत सदरच्या यूटय़ूब चॅनेल्सनी एप्रिल ते जून या कालावधीत आपल्या प्लॅटफॉर्मवरुन सदरची चॅनेल्स काढून टाकल्याची माहिती देण्यात आली आहे. गुगलने आपल्या तिमाही बुलेटीनमध्ये ही माहिती दिलीय. कारवाई केलेल्या यूटय़ूब चॅनेल्सवर सामान्य पातळीवर एक माहितीची भेसळ करुन तयार केलेला आशय आणि बिगर राजकीय आशय सदर यूटय़ूबवर पोस्ट करत आल्याची माहिती आहे.