नवी दिल्ली
इंटरनेट क्षेत्रातील कंपनी गुगलने फिटनेस उपकरणांच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया फिटबिट कंपनीचे अधिग्रहण नुकतेच केले आहे. हे अधिग्रहण गुगलने 2.1 अब्ज डॉलर्स मोजून केले आहे. या अधिग्रहणानंतर गुगल आणखी बलवान होण्यास मदत होणार आहे. गुगलला अधिकतर नफा हा जाहिरातीतून मिळत आहे. कंपनी अब्जावधी वापरकर्त्यांच्या आवडीनिवडीनुसार आवश्यक माहितीचा आधार घेत जाहिराती करण्यावर भर देते. फिटबिटच्या अधिग्रहणानंतर फिटबिटच्या 2.9 कोटी वापरकर्त्यांची भर गुगलमध्ये पडणार आहे. जाहिरातीसाठी यांचा उपयोग कंपनीला करता येणार आहे.