अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीममधील 232 बग्ज शोधल्याचे स्पष्ट
एका भारतीय सायबर तज्ञाने अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीममधील कमतरता शोधून काढत भरभक्कम कमाई केली आहे. त्याच्या संशोधनाबद्दल त्याला गुगलने 8.7 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 65 कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. अमन पांडे असे या सायबर तज्ञाचे नाव आहे. त्याने 2021 या वर्षामध्ये गुगलच्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीममधील 232 बग्ज शोधून काढले आहेत.
गुगलने आपल्या अहवालात इंदूरच्या अमन पांडे याचा विशेष उल्लेख केला. बग्ज मिरर टीमचे अमन पांडे हे गेल्या वषी आमचे सर्वोच्च संशोधक होते, अशा शब्दांत गुगलने अमन यांचे कौतुक केले.
अमनने भोपाळ एनआयटीमधून बीटेक केले आहे. बग्ज मिरर कंपनीचा तो संस्थापक आहे. त्याचा 15 जणांचा स्टाफ आहे. त्याचे वडील स्टेशनरी दुकान चालवतात. अमनची कंपनी गुगल, ऍपल आणि अन्य कंपन्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत बनवण्यात मदत करते. त्याच्या कंपनीने 2019 मध्ये पहिला अहवाल दिला. तेव्हापासून त्याने अँड्रॉईड व्हल्नेरेबिलिटी रिवॉर्ड प्रोग्रॅमसाठी (व्हीआरपी) 280 हून अधिक व्हल्नेरेबिलिटी नोंदवल्या आहेत. अमनने बग्ज मिरर ही स्टार्टअप कंपनी जानेवारी 2021 मध्ये सुरू केली होती.