घराच्या गार्डनमध्ये सायकली ठेवल्या होत्या लपवून
ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने इतक्या सायकली चोरल्या की त्याचे पूर्ण बॅक गार्डन त्या सायकलींनी भरून गेले. पोलीस दीर्घकाळापासून सायकल चोराचा शोध घेत होते. हा चोर अखेर गुगलमुळे पकडला गेला आहे. गुगल अर्थमध्ये त्याच्या घराची स्थिती पोलिसांना दिसून आली. पोलिसांना घराच्या बॅकयार्डमध्ये गुगल अर्थद्वारे सायकलींचा ढिग दिसून आला होता. ऑक्सफोर्डमध्ये राहणाऱया या व्यक्तीच्या घरातून पोलिसांनी सुमारे 500 सायकली जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी या 54 वर्षीय व्यक्तीला अटक केली, तेव्हा त्याचा पूर्ण बॅकयार्ड सायकलनी भरून गेल्याचे पाहून ते अवाप् झाले. थेम्स व्हॅली पोलिसांनी यासंबंधी वक्तव्य जारी करत माहिती दिली आहे. संबंधित व्यक्तीच्या विरोधात यापूर्वी देखील अनेक तक्रारी नोंदविल्या गेल्या होत्या. तपास केल्यावर या चोरीचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
शेजाऱयांनी दिली माहिती
संबंधित व्यक्तीच्या घराच्या परिसरात अनेक सायकली उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्याचा पूर्ण बॅकयार्डच सायकलनी भरून गेला होता. अनेक वर्षांपासून आपण या व्यक्तीच्या घरामागे अशा सायकली उभ्या असल्याचे पाहत आहोत असे त्याच्या शेजाऱयाने सांगितले. संबंधित शेजाऱयाने पोलिसांना याविषयी कळविले होते.
आफ्रिकेत पाठवायच्या होत्या
संबंधित व्यक्तीला सायकलबद्दल विचारणा केल्यावर तो त्या आफ्रिकेतील गरजू मुलांसाठी जमवत असून लवकरच पाठविणार असल्याचे सांगायचा. या सायकल्स तो व्हॅनमधून आणायचा असे त्याच्या शेजाऱयाने सांगतले आहे. तर पोलीस संबंधित सायकलींच्या मालकांचा शोध घेत त्यांना त्या परत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.