वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सच्या डाटा प्रायव्हसी रेग्युलेटरने (विदा खासगीत्व विषयक नियामक) गुगल कंपनीला 10 कोटी युरोंचा दंड ठोठावला आहे. गुगलवरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे. फ्रान्सच्या ऑनलाईन एडवर्टायजिंग ट्रकर्स (कुकीज)च्या नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन कंपनी अमेझॉनवरही 3.5 कोटी युरोंचा दंड ठोठावण्या आल्याची माहिती सीएनआयएलने दिली आहे. या कंपनीवरही गुगलसारखेच आरोप झाले आहेत. गुगलचे प्रेंच भाषेतील संकेतस्थळ आणि अमेझॉनवर ऍडवर्टायजिंग कुकीजला संगणकात राखून ठेवण्यासाठी संबंधिताची मंजुरी घेतली जात नव्हती, असे फ्रान्सच्या नियामकाला आढळून आले आहे. ऑनलाईन नियमांच्या अंतर्गत कुकीजला राखून ठेवण्यासाठी संबंधिताची मंजुरी आवश्यक आहे.
ठोस माहिती देण्यास अपयश
इंटरनेट ग्राहकांना ठोस माहिती देण्यासही गुगल आणि अमेझॉन अपयशी ठरले आहे. ही माहिती या कंपन्यांना ऑन लाइट ट्रकर्सप्रकरणी द्यावी लागणार होती. तसेच संबंधित व्यक्ती कशाप्रकारे प्रेंच संकेतस्थळावर एखाद्या कुकीज नाकारू शकतो, याचीही माहिती देणे आवश्यक होते, असे फ्रान्सच्या नियामकीय यंत्रणेने म्हटले होते.
3 महिन्यांची मुदत
अमेझॉन आणि गुगल या कंपन्यांकडे इन्फॉर्मेशन बॅनर बदलण्यासाठी 3 महिन्यांची मुदत होती. या कंपन्यांना याप्रकरणी अपयश आल्यास दुरुस्ती होईपर्यंत प्रतिदिन 10 हजार युरोंचा अतिरिक्त दंड भरावा लागणार असल्याचे सीएनआयएलने म्हटले आहे. सीएनआयएलने गुगल आणि अमेझॉनवर ठोठावलेला दंड आतापर्यंतचा सर्वाधिक ठरल्याची माहिती यंत्रणेच्या प्रवक्त्याने दिली आहे.