ऑनलाईन टीम / मुंबई :
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल 33 हजार 737 कोटींची गुंतवणूक करणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली.
रिलायन्स इंडस्ट्रीजची आज 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. यावेळी बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, गुगल जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 33 हजार 737 कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणूकीद्वारे गुगल जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 7.7 टक्क्यांची भागीदारी घेईल. गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे भारताला 2G मुक्त करु, असेही अंबानी यांनी सांगितले. गुगलच्या गुंतवणुकीनंतर तीन महिन्यांच्या काळात जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 1 लाख 52 हजार 056 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.
भारतात पुढील वर्षी 5G लॉन्च करणार
जिओ पुढील वर्षी संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेले 5G नेटवर्क लॉन्च करणार आहे. 5G चे परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लाॅंच करण्यास जिओ सज्ज आहे. जिओ हे तंत्रज्ञान जगभरात पोहवण्यासाठीही कटिबद्ध असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.