मुंबई
गुगलने आपल्या इंटरनॅशनल मनी ट्रान्स्फर सुविधेची सुरुवात करणार आहे. आता या सुविधेचा वापर करुन ग्राहकांना एका देशातून दुसऱया देशात पैसे पाठविता येणार आहेत. सदरची सुविधा ही सध्या अमेरिकेतील ग्राहकांसाठी असल्याची माहिती आहे. परंतु चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत जगातील 80 देशांमध्ये ही सुविधा सुरू होणार असल्याची माहिती आहे. गुगलने चालू आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्स्फरसाठी रेमिटेंस फर्म म्हणजे पैसे पाठविणारी कंपनी वाइज आणि वेस्टर्न युनियनच्या सोबत भागीदारी केली आहे. याच्या आधारे आपले पैसे दुसऱया देशात पाठविण्याची सेवा उपलब्ध होणार असल्याचे संकेत आहेत.
भारत एक मोठा बाजार
लोकसंख्येचा विचार केल्यास पैसे पाठविण्याच्या बाजारात भारताचे स्थान अव्वल स्थानी असल्याचे पहावयास मिळत आहे. गुगलने जगातील 470 अब्ज डॉलरच्या या रेमिटेंस म्हणजे पैसे पाठविण्याच्या बाजारात टेक्नॉलॉजीच्या आधारे मोठी हिस्सेदारी प्राप्त करण्याची योजना बनवत आहे.
अनेक देशांमध्ये पोहोचण्याचे ध्येय
कोरोनाच्या संकटामुळे विविध व्यवसाय प्रभावीत झाले आहेत. यामध्ये प्रत्यक्षपणे व्यवसाय करण्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे अन्य साधनाच्या आधारे व्यवहार केले जात आहेत. यामध्ये गुगल पे आता जगातील जास्तीत जास्त देशांमध्ये आपले जाळे निर्माण करण्याचे ध्येय ठेवत काम करत असल्याची माहिती आहे.