वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रिक कार बनविणारी कंपनी टेस्ला यांना गुजरात सरकारकडून जवळपास 1000 हेक्टर जमिनीची ऑफर देण्यात आली आहे. सदरची जमीन ही कच्छच्या जवळ आहे. या ठिकाणी निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी टेस्लाला ऑफर मिळाली आहे.
टेस्लासाठी फक्त गुजरातकडूनच ऑफर मिळणार आहे, असे नाही तर यासोबतच कर्नाटक आणि महाराष्ट्राकडूनही जागा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या वर्षी 8 जानेवारीला टेस्लाने कर्नाटकात बेंगळूरमध्ये ‘टेस्ला इंडिया मोर्ट्स ऍण्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने कंपनी रजिस्टर केली आहे.
महाराष्ट्रासोबत बैठक
महाराष्ट्र सरकार आणि टेस्लाचे अधिकारी यांच्यामध्ये जवळपास चार वेळा बैठक पार पडली आहे व टेस्लाला जमिनीची ऑफर सादर करण्यात आली आहे. परंतु टेस्ला या जागेवर आपला उत्पादन प्रकल्प उभारणार की नाही हे मात्र कळू शकलेले नाही.