अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोमवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आली. रविवारी सायंकाळी एका कार्यक्रमात भाषण करत असताना भोवळ आल्याने ते व्यासपीठावरच कोसळले होते. त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून अहमदाबादमधील युएन मेहता रुग्णालयात त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून रक्तदाब कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली. 64 वषीय विजय रुपानी 2016 पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विजय रुपानी वडोदरा येथील नझीमपुरा परिसरात आयोजित सभेमध्ये रविवारी सहभागी झाले होते.