ऑनलाइन टीम / अहमदाबाद :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने फैलावतआहे. गुजरात मध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाने यांनी आज कोरोनाची टेस्ट करून घेतली. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. मात्र त्यांनी खबरदारी म्हणून स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ते कोरोना ची लागण झालेले काँग्रेसचे आमदार इम्रान खेडा वाला यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी आज खबरदारी म्हणून स्वतः ची टेस्ट करून घेतली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. मात्र, त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे कामकाज पाहणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे सचिव अश्विन कुमार म्हणाले की, रुपाणी यांची तब्येत सध्या स्थिर असून ते आता सर्व कामकाज व्हिडीओ कॉलिंग, टेलिफोन च्या माध्यमातून घरातूनच पाहणार आहेत. तसेच पुढील आठवड्यापर्यंत कोणीही मुख्यमंत्र्यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेऊ शकणार नाही. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.