गांधीनगर –
गुजरातच्या किनारपट्टीवर भारतीय समुद्रात रविवारी एक इराणी बोट पकडण्यात आली. या बोटीतून हेरॉईनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच बोटीतील सात क्रू मेंबर्सनाही ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य दहशतवादविरोधी पथक आणि तटरक्षक दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली. बोटीतून 30 ते 50 किलो अवैध अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 150 ते 250 कोटी असल्याची माहिती तपास अधिकाऱयांकडून देण्यात आली.