ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गुजरातमध्ये आता जबरदस्तीने धर्मांतर करून फसव्या पद्धतीने लग्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लव्ह जिहादच्या कायद्याला मान्यता दिली आहे. 15 जूनपासून हा कायदा लागू होईल. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी हा निर्णय घेतला आहे.
जबरदस्तीने धर्मांतर होण्यापासून रोखण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लव्ह जिहाद कायद्याच्या मंजुरीवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर राज्यात लव्ह जिहादवर प्रभावी कायदा करण्यात आला.
फसव्या पद्धतीने लग्न करून जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांना लव्ह जिहाद कायद्यात 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. गुजरात विधानसभेत लव्ह जिहाद विधेयक खूप गदारोळात मंजूर झाले होते.