ऑनलाईन टीम तरुण भारत
नार्को समनव्य केंद्राच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व भारतीय बंदरांवरील कार्गो कंटेनरची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. या कंटेरनमधून प्रतिबंधित मालाची वाहतूक होऊ नये यासाठी अमित शाह यांनी आदेश दिला. कंटेनरची तपासणी करण्यासाठी लागणारे स्कॅनर आणि इतर उपकरणांची व्यवस्था खासगी आणि सरकारी बंदरांवरील व्यवस्थापनाला करावी लागणार आहे. अमित शाह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे आणण्यात आलेल्या ड्रग्जची माहिती मिळवण्यासाठी श्वान पथक तयार करण्यास सांगितलं आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या समन्वयाने यासंदर्भात एक धोरण तयार करणार आहे. जेणेकरुन सर्व राज्यांतील कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींना बेकायदेशीर अंमली पदार्थांची माहिती मिळवणाऱ्या श्वान पथकांपर्यंत पोहोचता येईल.