ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातमध्ये 24 तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. आज दुपारी 12.57 वाजता 4.4 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र राजकोटच्या उत्तर-पश्चिमेस km 83 कि.मी. होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजता गुजरातमध्ये 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र कच्छ जिल्ह्यातील भाचाळ जवळ होते. कच्छ, राजकोट, अहमदाबाद आणि पाटण या शहरांमध्ये भूकंपाचा धक्के जाणवले.काल रात्रीपासून गुजरातमध्ये 11 लहान-मोठ्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.