ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
तौत्के चक्रीवादळ सुरू असतानाच गुजरातमधील अमरेलीजवळ सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे सध्या तरी कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टल स्केल एवढी होती.
- राजकोटमध्ये ही भूकंप
गुजरातमधील राजकोटमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टल स्केल एवढी होती. भूकंपाचे धक्के पहाटे 3 वाजून 37 मिनिटांनी जाणवले. यामध्ये कोणत्याही प्रकरची जिवीतहानी झालेली नाही आहे.
- तौत्के चक्रीवादळ : ॲलर्ट जारी
तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात मधील समुद्र किनारी भागात ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 17 आणि 18 मे रोजी गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळाच्या भीतीने नवसारी मधील मच्छिमाऱ्यांच्या होड्या समुद्रात तरंगताना दिसत आहेत.